वसमत मध्ये क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी
वसमत (प्रतिनिधी):
समतेचा विचार मांडणारे बाराव्या शतकातील महान समाजसुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती वसमत शहरात अत्यंत भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळपासूनच शहरात मंगलमयी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात विविध मंडळांच्या वतीने महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शहरातील प्रमुख चौकांमध्ये भगवे ध्वज आणि महात्मा बसवेश्वरांचे विचार दर्शवणारे फलक लावण्यात आले होते. एस.टी. बसस्थानक परिसर आणि गवळी मारोती मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात भाविकांची मोठी गर्दी होती
दुपारच्या सुमारास शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रॅली दरम्यान ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता
वसमत गवळी मारुती मंदिर या ठिकाणी बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व तसेच सायंकाळी बसवेश्वर महाराज यांची भव्य अशी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने करण्यात आली त्यावेळी सर्व भजनी मंडळ महिला भगिनी समाज बांधव या ठिकाणी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे .आतिश दांडेगावकर .यांनी भेट दिली व तसेच श्री दिगंबर शिवाचार्य महाराज . श्री पादेश्वर महाराज .सर्व सन्माननीय नगरसेवक सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
लिंगायत समाज बांधवांसह इतर सर्व समाजघटकांनी या जयंती सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेऊन सामाजिक एकतेचे दर्शन घडवले या सोहळ्यामुळे संपूर्ण वसमत शहर बसवमय झाल्याचे पाहायला मिळाले.
