वसमत येथे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी
आ. राजू भैया नवघरे यांची प्रमुख उपस्थिती
वसमत : येथे सकल दिगंबर जैन समाजबांधवाच्या वतीने जैन धर्मीयाचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २६२५ वा जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली यात मोठ्या सख्येने जैन बाधव महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
भगवान महावीर स्वामी जयंती निमित्त वसमत शहरात विविध धार्मिक,ण सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.भगवान महावीर स्वामी जयंतीनिमित्त महावीर मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली.
ढोलताशाच्या तालावर निघालेली ही शोभायात्रा झेंडा चौक,पोलिस स्टेशन,बाजार पेठेतील मुख्य मार्गाने,काढण्यात आली.महावीर किर्तीस्थंभाचे पुजन,अमित पंचवाटकर व सौ.सीमा अमित पंचवाटकर,तसेच यावेळी वसुमती नगरीचे लोकप्रिय आमदार राजुभैय्या नवघरे नगराध्यक्ष सौ.सुनिता मनमोहन बाहेती,कन्हैया बाहेती,गटनेते सचिन दगडू,गटनेते संजय भोसले, वसंत चेपुरवार,नगरसेवक धिरज कुल्थे,रवी बडवणे,संदीप वरवंटे, मनोज चव्हाण,भिमराव भोसले, पिंटू महाकाळे,जगदिश जाधव.व शहरातील मान्यवर याच्याहस्ते पूजन करण्यात आले.मिरवणूक महावीर दिगबर जैन मदिर येथे पोहोचली.त्यानंतर सकाळी भगवान महावीर मिरवणूक, ८:४५ ते ९:१५ भगवान महावीर अभिषेक व ९:१५ ते १२ या वेळेत भगवान महावीर अभिषेक जन्मोत्सव व पाळणा मंगल आरती करण्यात आली.व शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.शोभायात्रेत सकल दिगंबर जैन समाजातील महिला,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील मिरवणुक यशस्वी करण्यासाठी यशवंत दिपक, चंदुलालजी बुजूर्गे,गंगाधर महाजन,विजयकुमार महाजन, हिरालाल सराफ,प्रभाकर पोफाळकर,डॉ.विनोद सोवितकर, सावन पंचवाटकर,महेंद्र यंबल, अजित यंबल,सुभाष यंबल,जैनेंद्र लोखडे,महेंद्र सराफ,अनिल महाजन धीरज आक्करबोटे,प्रवीण पोफाळकर,भागोरराव वरवंटे,विजय संघई,आदित्य आक्करबोट्टे,पुष्पेंद्र आक्करबोटे, प्रकाश महाजन,कचरू देशमाने, सुरेंद्र कुमार वरवंटे,सुमीत पुरजळकर,वैभव कंदी,विरेंद्र लोखंडे अंकित यंबल,देविदासराव पुरजळकर,प्रतुल पोफाळकर,गौरव डहाळे,अजय संघई,अभय पंचवाटकर,दिलीप कान्हेड,नवनित माद्रप,पंकज दोडल,पियुश यंबल, विशाल गोटुरवार लक्ष्मी संघई, पायल वरवंटे,मधुरा सराफ,पूजा सोवितकर,ज्योती महाजन,पूजा यंबल,मालती महाजन,मंदाकिनी यबल,शीला पोफाळकर,जयश्री पुरजळकर,सुरेखा वरवंटे,सुक्ष्मा गोरे,अभिलाषा यंबल,मीना बुरसे, सपना गोटुरवार,रश्मी कदी,अंकीता आक्करबोटे यांच्यासह सकल दिगंबर जैन समाजबांधवानी पुढाकार घेतला
