अतिश दांडेगावकर जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भाजपचे कमळ हाती घेणार
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव आतिश दांडेगावकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असून, यानिमित्ताने हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न होईल.
मराठवाड्याच्या राजकारणातील महत्त्वाचे घराणे असलेल्या दांडेगावकर परिवारातील तरुण नेतृत्व आतिश दांडेगावकर यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर उद्या दि. २६ फेब्रुवारी रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपचे ‘कमळ’ हाती घेणार आहेत.
मुंबई सीबीडी कोकण भवन येथे नियोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडेल. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
