गुरुद्वारा दमदमा साहेब वसमत येथे सालाना जोड मेला (चौकी) चे आयोजन
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुद्वारा दम दमा साहेब वसमत येथे सालाना जोडमेला चौकी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे
वसमत बस स्थानकापासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमा ला सकाळी 10 वाजता पायी दिंडीचे चौकी साहेब चे आयोजन करण्यात आले आहे सकाळी 11.30 वाजता सदरील दिंडी ही गुरुद्वारा दमदमा साहेब येथे पोहोचेल व त्यानंतर सत्संग व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
या सर्व कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच महाप्रसाद ( लंगर) चे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे व जास्तीत जास्त नागरिकांनी व भाविकांनी सदरील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन डॉ.स.विजय सतबीर सिंघ मुख्य प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड व स. हरजीत सिंघ कडेवाले अधीक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड यांनी केले आहे
