आ. नवघरे यांच्या प्रयत्नांना मोठे यश! येलदरी-सिद्धेश्वर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ३ पाणी आवर्तनांना मंजुरी!
चौथ्या आवर्तनासाठी प्रयत्न सुरू : आ. राजू भैया नवघरे
वसमत प्रतिनिधी :
येलदरी व सिद्धेश्वर धरण कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी तीन पाणी आवर्तनांना मंजुरी; चौथ्या आवर्तनासाठी आमदार राजूभैय्या नवघरे यांचे प्रयत्न सुरू
वसमत, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : येलदरी व सिद्धेश्वर धरण कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील पिकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैय्या नवघरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी पूर्णा प्रकल्पातून तीन पाणी आवर्तने देण्यास मंजुरी मिळाली आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण दिलासा मानला जात आहे.
यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळावे, यासाठी आमदार राजूभैय्या नवघरे यांनी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने तीन आवर्तनांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना अधिक दिलासा मिळावा आणि पिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढावी, यासाठी चौथे पाणी आवर्तन मिळवून देण्यासाठीही आमदार राजूभैय्या नवघरे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
मंजूर नियोजनानुसार वसमत शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, हट्टा शाखा कालवा तसेच अंतिम शाखा कालव्यामधून पाणी आवर्तने सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक आवर्तनाचे नियोजन १२ दिवसांचे असून, नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
पाणी आवर्तनाचे नियोजित वेळापत्रक :
* पहिले आवर्तन : १ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६
* दुसरे आवर्तन : १ जानेवारी ते २० जानेवारी २०२७
* तिसरे आवर्तन : १ मार्च ते २० मार्च २०२७
या नियोजनानुसार येलदरी व सिद्धेश्वर धरण कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पशुधनासाठी चारा व पाण्याची आवश्यक व्यवस्था करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य!
शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळावे, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे आणि दुष्काळाच्या संकटात त्यांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार राजूभैय्या नवघरे कटिबद्ध आहेत. तीन आवर्तनांना मंजुरी मिळाली असली, तरी शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन चौथे आवर्तन मिळवण्यासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरू राहणार आहे.
शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या सिंचनविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार राजूभैय्या नवघरे यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. पाणी आवर्तने मंजूर झाल्या मुळे आगामी काळात शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी नक्कीच मदत होणार
