शिवसेना तालुकाप्रमुख राजू दादा चापके यांच्या तर्फे मिळाल्या वसमत तालुक्याला तीन नवीन रुग्णवाहिका
शिवसेना नेते खा. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकांचे झाले लोकार्पण
मुंबई :
वसमत तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपत्कालीन आरोग्य सुविधा मिळाव्या याकरिता वसमत शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख राजू दादा चापके यांच्या संकल्पनेतून वसमत विधानसभा मतदारसंघासाठी तीन नवीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा मुंबईत पार पडला
आज मुंबई येथे शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते शिवसेना तालुकाप्रमुख राजुदादा चापके यांच्या नवीन तीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आरोग्यसेवेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, संकटाच्या काळात नागरिकांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे, या उद्देशाने हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या सोहळ्याला शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, हिंगोली जिल्हाप्रमुख संतोषरावजी बांगर, आमदार सईद भैय्या खान यांच्यासह अनेक मान्यवर व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याच्या भावनेतून वसमत तालुक्यासाठी तीन रुग्णवाहिका द्वारे रुग्ण सेवा करण्याचा व जनसेवेप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करणारा आहे
— राजु (उर्फ) प्रभाकर चापके
शिवसेना तालुकाप्रमुख, वसमत विधानसभा
