पेट्रोल पंपावरील खून प्रकरणातील आरोपींना २६ तासांच्या आत घेतले ताब्यात !
स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीची उल्लेखनीय कामगिरी
वसमत प्रतिनिधी :
कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हदिदत इंडियन ऑईल कंपनीच्या मॅनेजर महेश अण्णाराव शेळके, वय ३७ वर्षे, रा. केळव ता. अहमदपूर, जि. लातूर यांचा खून झाल्याची घटना दिनांक ०६/१०/२०२६ रोजीचे १६.०० वा.चे सुमारास घडली होती. घटनेचे गांर्भीय ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत तत्परतेने आणि कौशल्याने चक्रे फिरवुन अवघ्या २६ तासात खूनाच्या गुन्हयातील ०५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदर प्रकरणी पो.स्टे. कुरुंदा येथे गुरनं ३७०/२०२६ कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२), ३५१(३) भा.न्या.सं २०२३, सहकलम ४/२५ भा.ह. का अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन मा. डॉ. श्रेणिक लोढा, पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी घटनास्थळी स्वतः हजर राहुन पोनि श्री. मोहन भोसले, स्थागुशा, हिंगोली यांना गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा जलद गतीने शोध घेऊन गुन्हयातील आरोपी नामे ०१) श्रावण गंगाराम वाकुडे, रा. बोबडे टाकळी ता.जि. परभणी ह.मु. गोविंदनगर, वसमत, महीला आरोपी नामे ०२) लता भ्र. साहेब पांडवीर, रा. नालेगांव ह.मु. हर्षनगर, वसमत, ०३) उमेश साहेबराव पांडवीर, रा. नालेगांव ता. औंढा ह.मु. हर्षनगर, वसमत, ०४) राहुल उत्तमराव धायजे, रा. हर्षनगर, वसमत, ०५) प्रथमेश विक्रम वाघमारे रा. सम्राट कॉलनी, वसमत यांना सदर गुन्हयात ताब्यात घेण्यात आले.
सदरची कार्यवाही डॉ. श्री. श्रेणिक लोढा, पोलीस अधीक्षक, श्री. कमलेश मीना, अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे श्री मोहन भोसले, पोउपनि माधव जिव्हारे, पोह/भुजंग कोकरे, पोना/शिवाजी जालमिरे, पोशि/दत्तात्रय नागरे, पोशि/किशोर सांवत, पोशि/विशाल खंडागळे पोशि/आजम प्यारेवाले, पोशि/मुनिर मुन्नीवाले, पोशि/ज्ञानेश्वर गोरे, पोशि/ हरीभाउ गुंजकर, चापोशि/शंकर हराळ तसेच पोस्टे कुरूंदा येथील सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी व त्यांच्या पथकाने केली आहे.
सदर गुन्हा अत्यंत गंभीर व संवेदनशील असल्याने नमुद गुन्हयातील आरोपीतांना तत्परतेने अटक करणा-या वर नमुद पथकातील अधिकारी व अंमलदारांचे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी अभिनंदन केले आहे.
