वसमत तालुक्यातील वीज समस्येवर लवकरच तोडगा, नवीन सब स्टेशन उभारणीसह ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होणार
वसमत प्रतिनिधी :
तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वीज समस्येवर आता लवकरच कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना भेडसावणारी अखंडित वीज पुरवठ्याची अडचण दूर करण्यासाठी वसमत चे आमदार राजू भैया नवघरे यांनी मुंबई येथे महावितरणचे संचालक औंढेकर साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली
तालुक्यात नवीन सब स्टेशनची उभारणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार नवीन ट्रान्सफॉर्मर देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे वसमत तालुक्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे..
वसमत व औंढा तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मरची उपलब्धता तसेच शेतीसाठी आवश्यक विद्युत सुविधांबाबतच्या समस्या यावेळी ठामपणे मांडल्या. या समस्यांची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
🔹 ५ MVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर
🔹 शेतीसाठी २५ नवीन ट्रान्सफॉर्मर
🔹 वसमत तालुका व शहरासाठी ६० नवीन ट्रान्सफॉर्मर
🔹 आसेगाव येथील नवीन सबस्टेशन लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना
🔹 JNV थोरावा सबस्टेशन येथे ५ MVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या सूचना
या निर्णयांमुळे वसमत व औंढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
वसमत तालुक्याचा बहुतांश भाग हा शेतीवर आधारित असून, गेल्या काही काळापासून कमी व्होल्टेज आणि वीज कपातीमुळे नागरिक आणि शेतकरी त्रस्त होते. या समस्येची गंभीर दखल घेत प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. या नवीन पायाभूत सुविधांमुळे वीज गळतीचे प्रमाण कमी होईल आणि तांत्रिक बिघाड झाल्यास ते तातडीने दुरुस्त करणे शक्य होणार आहे.
