जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग व ज्युदो स्पर्धेत वसमतच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी!
वसमत :
नुकत्याच वसमत येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग व ज्युदो स्पर्धेत वसमतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची जोरदार छाप उमटवत घवघवीत यश संपादन केले,विविध वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यातील अव्वल स्थान पटकावल्याने वसमतच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

U-17 वयोगटात प्राची आनंद खरे, संस्कृती शिवसिंग चंदेल, अक्षरा कुंडलिकराव शिरसागर, गौरी शिवराम कुबडे, प्रीती प्रकाश दवणे, साईनाथ मुंजाजी कुसळे, कपिल गंगाधर सुपेकर आणि मारोती परमानंद कुबडे यांनी जिल्ह्यात प्रथम स्थान मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली तर गौरी दिलीप कुबडे, प्रथमेश गोविंद बर्वे आणि अतिश शंकर कुसळे यांनी द्वितीय स्थान पटकावले तर श्रेयश सोमनाथ हेगु लक्ष्मण बाबाराव शिंगारे यांनी तिसरा मान मिळावीला,
U-19 वयोगटात श्रेया शंकर घ्यार, गंगासागर गंगाधर धनाडे, ऋतुजा मनमंथ कैचे आणि अनिकेत गणेश तिमेवार यांनी जिल्ह्यात प्रथम स्थान मिळवत आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
तसेच U-14 वयोगटात ज्युदो स्पर्धेत प्रजक्ता आनंद खरे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत वसमतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला तर कृष्णा नारायण कुसळे सखाराम विश्वनाथ पिसाळ सुफियान शब्बीर कुरेशी यांनी द्वितीय स्थान पटकावले,या सर्व विद्यार्थ्यांनी मास्टर सोमनाथ हेगु आणि मास्टर संभाजी कुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव व मेहनत घेत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांसह क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्पर्धेचे उद्घाटन वसमतच्या नगराध्यक्षा सुनीताताई बाहेती यांच्या हस्ते झाले यावेळी उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश बोडखे, मुख्याध्यापिका जयश्री देवडा, माजी नगरसेवक प्रकाश इंगळे, लक्ष्मीकांत नवघरे, सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे, सागर जैस्वाल, फेरोज पठाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती,असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बारी खान यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींकडून विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन होत आहे,बॉक्सिंग आणि ज्युदोसारख्या क्रीडा प्रकारात वसमतच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या पाठबळाचे फलित असून वसमतच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.
