वसमत हादरले! बसस्थानकाजवळ युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला; दगडाने ठेचून खून केल्याचा संशय
सलग खुनाच्या घटनेने वसमत हदरले, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
वसमत प्रतिनिधी :
वसमत शहरातील बसस्थानकाजवळ, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या पाटबंधारे विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीच्या परिसरात दि.१८ सप्टेंबर रोजी अभिजीत रत्नाकर शहाणे (वय अंदाजे 33 वर्षे) या युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळुन आला. प्राथमिक माहितीनुसार,युवकाचा दगडाने ठेचुन खुन करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वर्दळीच्या परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ
शहरातील वर्दळीच्या परिसराच्या जवळच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अभिजीत शहाणे यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपासाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.मात्र,युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
नऊ दिवसांत दुसऱ्या खुनाच्या संशयाने नागरिकांत चिंता
दरम्यान,यापुर्वी वसमत शहरातील सोमवार पेठ परिसरात एका व्यक्तीचा खुन झाल्याची घटना घडली होती.या घटनेला नऊ दिवस पुर्ण होत असतानाच पुन्हा एका युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन तपासाची वेगवान चक्रे सुरू झाली आहेत
संध्याकाळपर्यंत गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली होती फिर्यादी संजय प्रभाकर टाक यांनी दिलेल्या तक्रार नुसार आरोपीवर पो.स्टे. वसमत शहर अंतर्गत
गु.र.नं. व कलम- 0585/2026 कलम 103(1) भा.न्या.सं. 2023
गुन्हे दाखल करण्यात आले आहे
अधिक तपास सपोनी शंकर डेडवाल व कर्मचारी करीत आहेत
अल्पावधीत घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असुन शहरातील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
सोमवार पेठेतील खुनाची घटना आणि अभिजीत शहाणे यांच्या मृत्यूचा परस्पर काही संबंध आहे का, याबाबत चर्चा सुरू आहे.शहाणे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, आरोपी कोण आहेत आणि हा प्रकार कोणत्या कारणातुन घडला,याचा तपास पोलीस यंत्रणेकडुन केला जात आहे.
