स्व. अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह म्हणून साजरा होणार
वसमत (प्रतिनिधी ) :
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाचा ठसा उमटविलेले उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अकस्मीत जाणे कधिही भरून न निघणारी हानी आहे. त्यांच्या कार्यकतृत्वाचा इतिहास कधीही विसरता येणार नाही. याची जाणीव काम करणाऱ्या प्रत्येकाला आहे. म्हणूनच राज्यशासनाने अजितदादा पवार यांची जयंती जनसेवा सप्ताह म्हणून साजरी करण्याचे घोषीत केले आहे.
त्याची सुरुवात 22 जूलै रोजी प्रत्येक कार्यालयातून होणार आहे. प्रतिमा पूजनाने सप्ताहाची सुरवात होणार आहे. मा. नामदार अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी वसमत विधानसभेचे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वतीने तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा, ग्रामपंचायत कार्यालये यांना मा. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले.
जनसेवा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे रेलचेल आपणास पाहावयास मिळणार आहे यामध्ये
वृक्षारोपण कार्यक्रम,महाआरोग्य तपासणी शिबीर,महारक्तदान शिबीर ,
महाआरती व फराळ वाटप
आषाढी एकादशी निमीत्त अभंगवाणी,
महिला सन्मान सोहळा ,
क्रीडापटू गौरव सोहळा व समारोप
आदी कार्यक्रमांचा यामध्ये सहभाग आहे
वसमत शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमांमध्ये आयोजित करून सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आमदार राजू भैया नवघरे यांनी केले आहे
विश्रामगृह वसमत येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख,पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
