विजयाची परंपरा कायम राखत आ. नवघरें चा pdc बँकेत दणदणीत विजय
(प्रतिनिधी ) :
बँकिंग आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी (PDC) बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले आहे. आपल्या कामाच्या धडाक्याने आणि जनसंपर्काच्या जोरावर मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आमदार राजू नवघरे यांनी विजयाची परंपरा कायम राखत PDC बँकेत दणदणीत विजय संपादन केला आहे.
आमदार राजू भैया नवघरे यांना 58 विरोधात असलेल्या तुषार जाधव यांना 20 मते मिळाली तर
एक मत बाद झाले. त्यामुळे 38 मतांनी सरशी घेऊन आ. राजू भैया नवघरे यांनी एकहाती विजय मिळवला
त्यांच्या या एकहाती विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत आमदार राजू नवघरे यांनी सुरुवातीपासूनच मतदारांवर आपली मजबूत पकड ठेवली होती. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. विरोधकांनी निवडणुकीत मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला, मात्र नवघरे यांच्या दांडग्या जनसंपर्कापुढे विरोधकांचे सर्व डावपेच सपशेल अपयशी ठरले आणि त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
आमदार राजूभैया नवघरे यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हित आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले आहे. हा विजय म्हणजे त्यांनी मतदार संघात आणि सहकार क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती असल्याचे बोलले जात आहे. मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर आणि विकासकामांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
