न.प. मुख्याधिकारी चीं तडकाफडकी बदली, अवैध नामांतर प्रकरण संशयाच्या फेऱ्यात
पोलिसांची संशयास्पद दिरंगाई! तक्रार देऊन आठवडा उलटला, तरी गुन्हा दाखल नाही
वसमत (प्रतिनिधी ) :
वसमत नगरपालिका अंतर्गत सध्या गाजत असलेल्या अवैध नामांतर प्रश्नावर चर्चा होत असताना लागलीच नगर परिषद मुख्याधिकारांची उचल बांगडी हा चर्चेचा विषय ठरत आहे
वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री रफिक कंकर यांची तडकाफडकी बदली होऊन त्या जागी पूर्वीचेच मुख्याधिकारी श्री आशुतोष चिंचाळकर यांची नगर विकास प्रशासनातर्फे वसमत नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश पारित करण्यात आले
या सर्व धामधुमीत नगर परिषदेच्या सार्वजनिक मालमत्ता शासकीय जागांचे अवैध नामांतरण हे विषय तपासाच्या फेऱ्यात असतानाच झालेली बदली ही चर्चेचा विषय ठरली आहे त्यामुळे या प्रकरणावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही व तसेच हे प्रकरण गुलदस्त्यात जमा होते का याची दाट शक्यता नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे
या प्रकरणावर मागील 4 ते 5 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाला मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले तपासासाठी ची पत्र यावर अजून तरी कोणतेही कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे या प्रकरणाची गूढ वाढत चालल्याचे दिसून येत आहे
4 ते 5 दिवसापूर्वी दिलेल्या तक्रार अर्जावर अजून सुद्धा कोणते कारवाई न होता गुन्हे दाखल झालेले नाहीत यामुळे पुढील कारवाई निष्पक्ष व पारदर्शी व्हावी अशी आशा नागरिका तर्फे व्यक्त करण्यात येत आहे..
