हिंगोली जिल्ह्याला मिळणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
वसमतला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणार – आ. राजू भैया नवघरे
हिंगोली,( वसमत ) : प्रतिनिधी
मुंबई येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग (माहेड ) , व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ यांच्या 2025 ते 2031 बृहद आराखडा मंजूर करण्यात आला
यामध्ये अनुक्रमे आराखड्यानुसार राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, हिंगोली, वाशिम, धाराशिव, सिंधुदुर्ग आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
तसेच याच जिल्ह्यांमध्ये बी. व्होक अभ्यासक्रमांची महाविद्यालयेही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव आणि परभणी येथे वास्तुशास्त्र अभ्यासक्रमांची महाविद्यालये, तर नंदुरबार आणि सिंधुदुर्ग येथे एचएमसीटी अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत हे प्रमुख बाजारपेठ असलेले ठिकाण शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहे त्यामुळे येणाऱ्या कार्यकाळात अभियांत्रिकी सारखी संस्था तालुक्याला मिळाल्यास नक्कीच शैक्षणिक क्षेत्रात भरभराट पाहायला मिळेल त्यासह वसमत तालुक्याचे व हिंगोली जिल्ह्याचे नावलौकिक भर पडेल अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा वसमत वासीयाकडून होत आहे
तसेच 2027 ते 2031 दरम्यान बी फार्मसी डी फार्मसी व औषध निर्माण शास्त्र च्या नवीन संस्थांना मंजुरी देऊ नये व प्रवेश क्षमता वाढू नये यासाठी केंद्र सरकार व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांना शिफारस करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले
या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, मंगल प्रभात लोढा राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
