पश्चिम बंगाल मधील प्रचंड विजयाचे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा
वसमत ( प्रतिनिधी) :
पश्चिम बंगाल, आसाम व पुदुच्चेरी येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड विजयामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, वसमत यांच्या वतीने आज झेंडा चौक येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वांनी एकमेकांना मिठाईवाटप करून आनंदोत्सव साजरा केला
यावेळी . शिवदास बोड्डेवार,उज्वलाताई तांबाळे, डॉ मारोती क्यातमवार, सुनील कार्ले, विष्णू बोचकरी, शिवाजी अलडींगे,ज्ञानेश्वर मुंजाळ, आदित्य देशपांडे, विजय कडतन, मयूर नांवदर, गणेश कमळू, राजेश भालेराव, मारोती बूट्टे,ओम म्यानेवार, संजय कळणे, संतोष हदवे, अविनाश गायकवाड, गजानन पप्पलवाड, शिवाजी गोरे, हरी आलसटवार, गोविंद यजगे, माधुरी देशमुख, प्रवीण पोफाळकर, गंगाप्रसाद सातपुते, वैभव अण्वेकर,आकाश बोकन, सुनिल आकाशे, प्रवीण पवार तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
