वसमत येथिल वीरशैव तेलीमठ अपरंपार स्वामी संस्थांन तर्फे भव्य शिव दीक्षा संस्कार सोहळा संपन्न
वसमत येथिल वीरशैव तेलीमठ अपरंपार स्वामी संस्थांच्या वतीने श्रीराष्ट्र संत वसुंधरारत्न शब्र गुरुवर्य 108 डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमद पुरकर मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य शिव दीक्षा संस्कार सोहळा वीरशैव तेलीमठ अपरंपार स्वामी संस्थान गणेश पेठ वसमत जिल्हा हिंगोली .
14/03/2026 रोज शनिवार गुरुवर्या आगमन झाले त्यानंतर चार वाजता वीरशैव तेली मठ येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली वीरशै व तेली मठ येथे भव्य शोभायात्रा आल्यानंतर उपस्थित गुरुवर्यांचे अमृत उपदेश झाले .
15 .3 . 2026 रोज रविवार सकाळी आठ ते बारा पर्यंत भव्य शिव दीक्षा संस्कार श्री गुरु शब्र 108 राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर यांच्या शुभहस्ते व आचार्य गुरुराज स्वामी यांच्या सानिध्यात संपन्न झाली व नंतर बारा ते दोन पर्यंत श्री राष्ट्रसंत वसुंधरा रत्न 108 डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला दुपारी दोन ते पाच महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले .
पुरोहित्य श्री कीर्तन पंडित भूषण स्वामी वाखारीकर व त्यांचे सहकारी होते यांनी मोलाचे कार्य केले .
या सर्व कार्यक्रमासाठी वीरशैव तेलीमठ अपरंपार स्वामी संस्थान विश्वस्त मंडळ व श्री राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज सदभक्त मंडळ गणेश पेठ वसमत जिल्हा हिंगोली या सर्वांचे सहकार्य लाभले .
यावेळी समाज बांधव, पुरुष , महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते
