रेल्वेच्या साहित्यावर डल्ला मारणारे गजाआड; वसमत पोलिसांची धडक कारवाई.
वसमत : रेल्वे स्टेशन दुरुस्तीसाठी आलेल्या साहित्यावर नजर ठेवून ददला मारणाऱ्या स्थानिक चोरट्यांना वसमत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अटक केली
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षकावर दगडफेक करून ३ क्विंटल लोखंडी गजाळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. पोलिसांनी या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
वसमत रेल्वे स्टेशन परिसरात सध्या रेल्वेच्या बांधकाम व दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. या ठिकाणी लाखो रुपयांचे साहित्य असून त्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही तैनात आहेत. ११ मार्च रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक कांबळे यांच्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी अचानक दगडफेक केली. या हल्ल्यानंतर चोरट्यांनी साइटवरून अंदाजे ३ क्विंटल गजाळी जबरीने चोरून नेले. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांना तातडीने तपासाचे
वसमत येथील रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या बांधकाम भागात सुरक्षा रक्षकावर दगडफेक करून तीन क्विंटल लोखंडी गजाळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. चोरून नेलेली गजाळी पोलिसांनी जप्त केली.
गजाळी पळविणारे दोघेही चोरटे वसमत शहरातीलच रहिवासी असून, यात अजय सतपाल चावरिया (३५, रा. तथागत नगर, वसमत), दिलीपसिंग जोगनसिंग चव्हाण (रा. समीर नगर, वसमत) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बांधकामाच्या ठिकणाहून चोरलेले १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे ३ क्विंटल लोखंडी गजाळीही जप्त करण्यात आली आहे.
आदेश दिले. सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. पथकाने परिसरातील
सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरट्यांची ओळख पटली. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, वसमतचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात सहायक पोलिस निरीक्षक शिवसांव घेवारे, भुजंग कोकरे, गजानन पाकळे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, साईनाथ कंठे, फौजदार ढोरे, गजानन भोपे, दिलीप करे, कुलकर्णी यांनी सहभाग घेतला
