वसमत शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’; आ. नवघरे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
वसमत (जिल्हा हिंगोली ):
वसमत शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सध्या वाहनधारकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. गेल्या काही महिन्यांत या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अपघातांचे वाढते प्रमाण आणि भीषणता वाढत असताना शाळकरी मुले विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला यांना रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागत आहे
वारंवार होणाऱ्या अपघातांचे प्रकार लक्षात घेता आ. राजूभैया नवघरे यांनी प्रत्यक्ष राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून पुलाच्या व रस्त्यांच्या दर्जेदार कामाकडे लक्ष देण्याच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या
वाळूची वाहतूक करणारे टिप्पर, हायवा, ऊस वाहतूक करणारे डबल ट्रॉली ट्रॅक्टर याचे कुठेही नियंत्रण प्रशासनातर्फे करण्याचे दिसून येत नाही
वेगवान व बेशिस्त वाहतुकीला कुठेतरी पाय बंद घालण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावे याची मागणी नागरिकातून होत आहे.
गतिरोधक बसवण्यासाठी शासनाची उच्चस्तरीय समिती निर्णय घेते त्यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा केल्यास मुख्या त्या ठिकाणी गतिरोधक बसवता येतील –
प्रफुल्ल देशमुख
अभियंता सां. बा. विभाग वसमत
नुकत्याच झालेल्या वसमत-नांदेड महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
भीषण धडक: वसमत-परभणी मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन तिघांना आपला जीव गमवावा लागला.
अपूर्ण काम महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाचे असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
रॉंग साईड आणि वेग: शहरातून जाणाऱ्या जड वाहनांचा वेग आणि अनेकदा होणारी ‘रॉंग साईड’ वाहतूक , ऑटो चालकांची होणारी मनमानी हे अपघातांचे मुख्य कारण ठरत आहे.
स्थानिकांच्या मागण्या
शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता, मदिना चौक, कौठा रोड आणि इतर मुख्य चौकांमध्ये गतिरोधक बसवणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आणि जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी नागरिक करत आहेत.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात अपघातांची ही मालिका अधिक भयावह रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पाहणी दरम्यान आ. नवघरे यांच्यासोबत प्रशासनातील अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, नगराध्यक्ष यांचे प्रतिनिधी कन्हैया बाहेती, नगर परिषदेचे गटनेते सचिन दगडू , नगरसेवक राजेश पवार, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
