“सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेवर शिक्कामोर्तब; आमदार नवघरेंची मागणी ला यश !”
वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी अनेक वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो. दिवंगत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून अनेक बैठका मंत्रालयात पार पडल्या होत्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे पण अनेक बैठका झाल्या..
हिंगोली जिल्हा हा राज्यपाल सिंचन अनुशेषात मोडतो. हा अनुशेष दूर करण्यासाठी व वसमत विधानसभा मतदारसंघातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आ. नवघरे सतत पाठपुरावा करत होते .
आता या सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली असुन त्यामाध्यमातुन सर्वेक्षण,अन्वेषण,ला पण मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून वसमत विधानसभा मतदारसंघातील पांगरा शिंदे सर्कल,अंबा सर्कल,शिरडशहापूर सर्कल,पुरजल सर्कल,पुर्ण या सर्कल मधील गांवे सिंचनाखाली येणार असून 3000ते 4000 हेक्टर सिंचन
क्षेत्र आता पाण्याखाली येणार आहे.
वसमत तालुक्यातील 25 च्या वर आणि औंढा तालुक्यातील 15 गावांमधील मोठे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील सिंचन क्षमतेत मोठी वाढ होणार असून, शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल…
आज वसमतकरांच्या जिव्हाळ्याचा विषय मार्गी लागत असताना सारखी राहून राहून अजित दादा यांची आठवण दाटून येत आहे. काहीही विकासकार्य असले की दादा हे कायम खंबीरपणे पाठीशी असायचे आज ते नसल्याची मोठी खंत आहे. यामुळे एका डोळ्यात योजना मार्गी लागल्याने हसू आणि दादा नसल्याने आसू आहे. असे आ. नवघरे यांनी उद्विग्नपणे आपले विचार यावेळी व्यक्त केले
शेवटी या सर्व प्रयत्नांना यश आले आहे. आता योजनेला मान्यता मिळाली असुन लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
