लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणार – अतिश दांडेगावकर”
अतिश दांडेगावकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; मुंबईत शक्तीप्रदर्शन”
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना.श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वसमतच्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपा पक्ष प्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व योजना जनतेच्या तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
राष्ट्र प्रथम या भूमिकेतून कार्य करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षात सहभागी झाल्याने जनसेवेच्या कार्याचा वेग आणखी वाढेल, असे अतिश दांडेगावकर यांनी पक्ष प्रवेश प्रसंगी बोलताना म्हणाले
केंद्रात पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यात मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात वेगवान विकास सुरू आहे. केंद्रातील आणि राज्यातील विकासाची गंगा वसमतच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनात समर्पित भावनेने जनसेवा कार्याचा नवा अध्याय सुरु होत आहे.. असे या वेळी ते म्हणाले
याप्रसंगी आमदार श्री.तानाजी मुटकुळे, माजी आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव, भाजपा हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री.गजानन घुगे, भाजपा नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.किशोर देशमुख, भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य श्री.गुरुपादेश्र्वर शिवाचार्य महाराज, भाजपा मुख्य प्रवक्ता श्री.नवनाथ बन यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
