*वसमतच्या हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात शिवजयंती निमित्त रांगोळीतून साकारली 2400 चौ.फुट शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती*.
वसमत येथील नामांकित असलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात शिवजयंती निमित्त *कलाकार मन्मथ चिलवंत आणि त्याच्या टीमने* 2400 स्क्वेअर फुटावर हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळीतून भव्य अशी प्रतिमा साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवाजी महाराजांची *तब्बल 2400 स्क्वेअर फुट* रांगोळी साकारण्यात आली आहे. *बहिर्जी स्मारक विद्यालय आणि मन्मथ आर्ट्स यांच्या पुढाकारातून* ही रांगोळी साकारण्यात आली आहे. बहिर्जी विद्यालयाचा माजी विद्यार्थी कलाकार मन्मथ चिलवंत आणि त्यांच्या 25 कलाकारांनी ही रांगोळी साकारली. ही *रांगोळी पाहण्यासाठी वसमत शहरातील विद्यार्थी, कलाकार मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे* ही रांगोळी काढण्यासाठी पंधरा क्विंटल वेगवेगळे कलर लागले आहेत तसेच सतत तीन दिवस मेहनत घेऊन ही रांगोळी साकारण्यात आली आहे. वेगवेगळ्या रांगोळीच्या कलरचा वापर करून ही भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार केली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ही *रांगोळी पाहण्यासाठी संपूर्ण वसमत कर हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात येत आहेत* ही भव्य दिव्य अशी ही हुतात्मा बहिर्जी विद्यालयातील शिवरायांची रांगोळी संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकाचा विषय बनली आहे. या सर्व कलाकारांचे हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. *हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव पंडितराव देशमुख सर, बहिर्जी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड. रामचंद्र बागल साहेब, बहिर्जी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पी.जी. शेळके सर, उपमुख्याध्यापक श्री जी. आर. आरकिलवाड सर, पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. जाधव मॅडम, पर्यवेक्षक श्री. डी. आर. बागल सर ,पर्यवेक्षक श्री के. बी. वायचाळ सर* या सर्व मान्यवरांच्या हस्ते कलाकार आर्टिस्ट मन्मथ चिलवंत आणि त्याच्या संपूर्ण टीमचे भव्य *सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपये पारितोषिक* देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे ,त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्याचा *गौरव करण्यात आला* . हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.जी. शेळके सरांनी ही शिवरायांची रांगोळी पाहण्यासाठी *वसमत मधील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आव्हान केले आहे* शिवजयंती निमित्ताने ही रांगोळी पाहण्यासाठी सर्वांनी वसमतच्या बहिर्जी विद्यालयात यावे असे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने बहिर्जी शाळेतील विद्यार्थ्यांनी *सिंहगड किल्ला आणि प्रतापगड* किल्ला बनविला आहे. त्यामध्ये *वेदांत काकडे, मन्मथ खाकरे, हरीओम राऊत, गौरव मांदळे, शिवम भंडारे, साई सूर्यवंशी, ओमकार सैंदाने* या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन हे दोन्ही किल्ले बनविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री वसंत गाडेकर, श्री अमोल सालमोठे, त्यांचे वर्ग शिक्षक श्री. एस.एस.भायेकर सर , श्री.चव्हाण पी. बी सर ,श्री.जी.व्ही. नवघरे सर, श्री. पोटे सर, श्री. युवराज पवळे, श्री.अमोल भालेराव, श्री साईनाथ म्यानेवार आणि ओम देशमुख सर या शिक्षकांनी त्यांना मदत केली. तसेच *आपलं वसमत हे पेज इंस्टाग्रामच्या माध्यमातून चालवणारे आणि बहिर्जी विद्यालयातील कार्यक्रमांना प्रसिद्धी देणारे आतिश बाचनवार* यांचेही बहिर्जी विद्यालयाच्या वतीने सत्कार करून कौतुक करण्यात आले. अशाप्रकारे शिवजयंतीच्या निमित्ताने बहिर्जी विद्यालया *स्वराज्याचा इतिहास साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे* या सर्व कलाकारांना बहिर्जी विद्यालयाचे *मुख्याध्यापक पी.जी. शेळके सरांची प्रेरणा आणि मार्गदर्शन* मिळाले आहे. त्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांची मदत मिळाली आहे.
*वृत्तांकन शालेय प्रसिद्धी विभाग – श्री एस.ए.कदम*
