वसमत मध्ये रंगणार राजकीय शिमगा, शरद पवारांच्या खंद्या समर्थकांचा मुलगा भाजपच्या वाटेवर
वसमत:
हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषतः वसमत विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव अतिष दांडेगावकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
समर्थकांशी चर्चेनंतर निर्णय घेतला असल्याचे यावेळी राजकीय चर्चातून निष्पन्न झाले काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आपल्या समर्थकांशी सविस्तर चर्चा करून मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का
जयप्रकाश दांडेगावकर हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. अशा परिस्थितीत त्यांच्याच मुलाने भाजपची वाट धरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला (शप) मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून, वसमतमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
होळीच्या तोंडावर वसमतमध्ये हा ‘राजकीय शिमगा’ चांगलाच गाजण्याची चिन्हे दिसत असून, दांडेगावकरांच्या या पावलामुळे राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत
