भारत नामपल्ली यांची श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकेचे अध्यक्ष श्री. शिवदास बोड्डेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा संचालक बालासाहेब जाधव यांच्या मातोश्री कै. श्रीमती पार्वतीबाई दाजीसाहेब जाधव महागावकर यांच्या दुःखद निधनाबद्दल संचालक मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष निवडीची कारवाई सुरू करण्यात आली यावेळी
उपाध्यक्ष पदासाठी श्री. भारत गंगाधर नामपल्ली यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षांनी त्यांची बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले.. त्यानंतर संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच बँकेचे तज्ञ संचालक ॲड. दीपक कट्टेकर यांची नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी बँकेचे संचालक
श्री. विनोद झंवर, श्री. दत्तात्रय दलाल, श्री. नागनाथराव कोम्पलवार, श्री. लक्ष्मीकांत कोसलगे, शेख मैनोद्दीन संदलजी, श्री. नारायण लाशिनकर, श्री. बालाजी माळवटकर, डॉ. धोंडीराम पार्डीकर, श्री. राधाकिशन साबणे, श्रीमती शकुंतलाबाई देवने, सौ. रुपाली दगडू, श्री. रमाकांत भागानगरे, अँड.दीपक कट्टेकर,तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
