अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
वसमत येथे आज आज रोजी अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात उत्सव लेकीचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. वसमत शहरातील नामांकित विद्यालय अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत येथे इयत्ता 1ली ते 12 वी च्या विद्यार्थिनींचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकनृत्य व वेगवेगळ्या राज्यातील पारंपारिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक बी डी.कदम सर, हे उपस्थित होते तर इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे अध्यक्ष मुरलीधरराव मुळे अण्णा, संस्थेचे सहसचिव संदीप कदम सर, प्रा. गजानन मुळे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ. पतंगे मॅडम, संध्या कातोरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिटकर सर यांनी केले तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरिता पतंगे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पीएसआय प्रणिता ढोरे मॅडम खूप सहकार्य केले .
