लेकीच्या हाकेला आमदाराची साथ! राजूभैय्या नवघरे यांनी निभावली सोनल खंदारे यांच्याबद्दलची सामाजिक जबाबदारी.”
राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे वसमत विधानसभा मतदारसंघाचे *आमदार राजूभैय्या नवघरे* यांनी पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
वसमत येथील रहिवासी *सोनल खंदारे* या तरुणीच्या आयुष्यात ओढवलेल्या अत्यंत कठीण आणि संकटमय काळात आमदार नवघरे मदतीसाठी धावून आले असून, त्यांनी सोनलला मोठा आधार दिला आहे.
डोक्यातील गंभीर गाठीच्या ऑपरेशनसाठी सोनलला मुंबई येथील नारायणा हेल्थ केअर हॉस्पिटल येथे स्वतः घेऊन जाऊन भैय्यांनी जबाबदारीने उपचारांची व्यवस्था केली.
तब्बल ११ तास चाललेले अवघड ऑपरेशन यशस्वी झाले आणि आज सोनल सुरक्षित आहे — ही बातमी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे
इतक्यावरच न थांबता, आमदार राजूभैय्या नवघरे यांनी प्रयत्न करून त्या रुग्णाला ₹५,३१,०००/- इतकी आर्थिक मदत मिळवून दिली.
यावेळी आरोग्य दूत म्हणून प्रकाश गव्हाणे ,अंबादास जाधव व मनोहर चव्हाण यांनी देखील खूप मदत केली
ही फक्त मदत नाही, तर एका कुटुंबाला मिळालेला नवा श्वास आहे..!
अशा कठीण समयी सोनल खंदारे व कुटुंबाला मिळालेला खंबीर आधार यामुळे सर्व स्तरातून व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे व मा. आ. राजू भैया नवघरे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे
