वसमत चे बस स्टॅन्ड आहे की ऑटो स्टॅन्ड! बस स्थानकात ऑटो चालकांची घुसखोरी
वसमत चे बस स्थानक आज एसटी बसेस थांबण्यासाठी आहे की ऑटो थांबण्यासाठी हेच कळेनासे झाले आहे प्रवासी पळविण्याच्या निमित्ताने खुलेआम बस स्थानकात ऑटो चालकांची घुसखोरी व आरेरावी प्रवासांच्या व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे
तालुक्याच्या मध्यवर्ती बस स्थानक असलेले वसमत बस स्थानक रोज हजारो प्रवाशांच्या ये जा करण्यासाठी महत्त्वाचे बस स्थानक मानले जाते यामध्ये हजारो शालेय विद्यार्थी व सामान्य नागरिक, महिला व शासकीय कर्मचारी सुद्धा या ठिकाणी ये जा करत असतात पण आज या महत्त्वाच्या असलेल्या बस स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठेही काळजी घेताना प्रशासन दिसत नाही
बेफाम आणि बेदरकारपणे ऑटो चालून नियमाचा भंग करून व बस स्थानकात प्रवेश करत आहेत व प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत
बस स्थानकाला लागूनच पोलीस चौकी असताना हा प्रकार घडत आहे हे विशेष..
आम्ही दर महिन्याला पोलीस प्रशासनाला सदरील ऑटो चालकांच्या मनमानी बद्दल व घुसखोरी बद्दल कारवाई करण्याचे पत्र देत असतो व आमचा सुद्धा कर्मचारी यासाठी आम्ही कायमस्वरूपी सेवेत असतो*
*आगार प्रमुख किशन कऱ्हाळे*
दोन दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेली कारवाई ही औट घटकेची दिसून येते यासाठी कायमस्वरूपी निगराणी राहावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे दक्षता हवी
बस स्थानकाला लागून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याकारणाने ऑटो चालकांचे मनमानी व भर रस्त्यात ऑटो उभे करणे यामुळे कायम वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, शालेय विद्यार्थी व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे बस स्थानक प्रशासन व वाहतूक विभाग लक्ष देईल अशी अपेक्षा नागरिकांतून होत आहे
