वसमत (शहर ) पोलिसांची धडाकेबाज कारवाई, मोबाईल चोराच्या काही तासातच आवळल्या मुसक्या
पोलीस स्टेशन वसमत शहर येथे दिनांक 17/2/2026 रोजी तक्रारदार नाम दत्ता विनोद सोन्नर वय 32 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी करीअर डिलीव्हीरी रा.मरसुळ ता. वसमत जि. हिंगोली यांनी तक्रार दिली की, दिनांक 13/02/2026 रोजी सकाळी 07.00 वाजण्याचे सुमारास करुणा मॅनेजमेंट सव्हीसेस लि.पुणे येथुन वसमत येथील अष्टविनायक एजेन्सीस यासाठी साईराज ट्रॅव्हलस दवारे पाठविण्यात आलेले पार्सल सॅमसंग कंपनीचा बॉक्स ज्यामध्ये सॅमसंग कंपनीचे ऑडरॉईड 12 मोबाईल किमती 737053/ रुपयचे बस्थानक वसमत येथे खुराना ट्रॅव्हल्सचे ऑफीस समोर ठेवले असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घेवुन गेले बाबत तक्रार दिली त्यावरुन पोलीस स्टेशन वसमत शहर येथे गुरन 90/2026 कलम 303 (2) भा. न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपासा सपोनि एस.बी. डेडवाल यांचे कडे देण्यात आला.
सदर गुन्हाचे तपासात सपोनि डेडवाल साहेब व त्याचे सोबत डि.बी. पथक अमलदार पोह/23 संभाजी लकुळे, पोह /131 नागोराव बाभळे, पोशी/428 रामदिनेवार अशांनी मा. पोलीस अधिक्षक निलभ रोहन, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मिना साहेब, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री केंद्रे साहेब, मा. पोलिस निरक्षक श्री सुधीर वाघ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हाचा तपास केला सदर गुन्हाचे तपासात सि.सी.टी.व्ही फुटेज च्या साह्याने आरोपी नामे शेख अरबाज शेख अफसर वय 26 वर्षे व्यवसाय मजुरी रा. दर्गामोहल्ला वसमत यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हा संबंधी विश्वासात घेवुन विचारुपुस करुन आरोपीचे ताब्यातुन गुन्हातील गेला माल शॅमसंग कंपनीचे अँन्डाईड 12 मोबाईल किमती 737053/ रुपय मुद्देमाल हास्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि डेडवाल हे करीत आहेत.
वरील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे मा. श्री निलभ रोहन पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी कौतुक केले आहे.
