वेळेचे पक्के दादा… वेळे आधीच आपल्यातून गेले!
आम्ही पोरके झालो – आ. नवघरे चीं शोकाकुल प्रतिक्रियाशा
शासकीय ईतमामात स. 11 वाजता होणार अंत्यसंस्कार
वसमत येथे अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याचे कळतात वसमत येथील व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करून आपले लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रति संवेदना प्रकट केल्या व तसेच सर्व शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या श्रद्धांजली मध्ये सहभाग घेतला होता
शासकीय विश्रामगृह येथे वसमत येथे विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे व तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आमदार राजू भैया नवघरे यांनी धीर दिला की तुम्ही कुठेही खचून न जाता तुमच्या पाठीशी मी उभा आहे
यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांचे अश्रू अनावर झाले व तसेच सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे .लक्ष्मीकांत भैया नवघरे .उप नगराध्यक्ष इमरान आली यांचे देखील अश्रू अनावर झाले .
अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले होते व नगरसेवक नगराध्यक्ष व कार्यकर्त्यांना धीर देताना स्वतः आमदार राजू भैया नवघरे यांचा सुद्धा अश्रूचा बांध फुटला *आम्ही पोरके झालो* असे यावेळी ते म्हणाले व सर्वांना धीर देण्याचे काम यावेळी त्यांनी केले
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होणारआहे. गृहमंत्री अमित शहा सोबत प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याचे समजते
