वसमतमध्ये पुरवठा विभागाचा दणका; हॉटेल्सवर छापे टाकून घरगुती सिलेंडर्स जप्त!
वसमत (हिंगोली) शहरात पुरवठा विभागाने हॉटेलवर मोठी कारवाई करत घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृतपणे व्यावसायिक वापर करणाऱ्यांना दणका दिला आहे. या मोहिमेत एकूण लहान मोठ्या सर्वच हॉटेलची तपासणी करण्यात आली असून ६ ठिकाणी नियमभंग आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
इंडेन व एचपी मिळून एकूण दहा घरगुती सिलेंडर यावेळी जप्त करण्यात आली
घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचा मुबलक साठा जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते पण तसेच त्याचा व्यवसायिक वापर रोखण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते त्या धर्तीवर वसमत तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांनी पुरवठा विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते
या पथकामध्ये नायब तहसीलदार श्री पी. जी. हांडे, गणेश जाधव, राहुल कांबळे व त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला
घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे हा कायद्याने गुन्हा असूनही, वसमत शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांकडून सर्रासपणे घरगुती सिलिंडर वापरले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर, पुरवठा विभागाने सोमवारी (दि. १६ मार्च २०२६) शहरात धडक तपासणी मोहीम राबवली.
आंतरराष्ट्रीय बाजारात व महायुद्धामुळे होत असलेली इंधनाचा तुटवडा जाणू नये याकरता प्रशासनातर्फे विशेष लक्ष देण्यात येत आहे
प्रशासनाचा इशारा:पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे हा ‘जीवनावश्यक वस्तू कायद्या’चे उल्लंघन आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा सुरूच राहतील आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या धडक कारवाईमुळे वसमतमधील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
