“शब्द पाळणारा लोकनेता गेला! वसमतकरांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
आज सुरमणी प्रा.दत्ता चौगुले सभागृह,वसमत येथे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शोकसभा ठेवण्यात आली.
यामध्ये वसमत विधानसभेतील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपले लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आपल्यातून निघून गेले असे अजूनही वाटत नाही. ज्या दादांचे आपल्या वसमत वर विशेष प्रेम होते त्या दादांना श्रद्धांजली द्यायची वेळ आज आपल्यावर आली.
यावेळी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरील हावभाव एकच सांगत होते की दादा चे जाणे सर्वांनाच चटका लाऊन गेले आहे.
सुरमणी प्रा. दत्ता चौगुले सभागृहात झालेल्या या सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमात आमदार राजू भैया नवघरे सहित काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व इतर पक्षाचे कार्यकर्ते, नेते व नागरिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते
