बाबुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लवकरच पद भरती : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
आ. नवघरे यांच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिकता देत बाबुळगाव येथे आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत पूर्णत्वास आली आहे पण तेथे पदभरती न झाल्यामुळे नागरिकांना सेवा देताना अडचणी येत असल्याचे आमदार राजू भैया नवघरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता
यावर आरोग्य मंत्री मा. प्रकाशजी आबिटकर साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संपुर्ण महाराष्ट्र मधील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक पदभरती शासनामार्फत लवकरात लवकर करण्यात येईल व हे आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
लवकरच हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास बाबुळगाव व परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल. जनतेच्या प्रश्नांसाठी अधिवेशनात सातत्याने आवाज उठवत राहणार,
आ. राजू भैया नवघरे
सदरील प्राथमिक आरोग्य केंद्रात पद भरती झाल्यानंतर बाबुळगाव व परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळेल हे निश्चित!
