रुग्णांसाठी दिलासा! वसमत उपजिल्हा रुग्णालयात मिळणार जागतिक दर्जाची डायलिसिस सेवा “
वसमत तालुक्यातील किडनी व संबंधित आजारांसाठी रुग्णांना द्यावयाचे डायलिसिस चे उपचार आता वसमत मध्ये उपलब्ध होणार असून त्यासाठी सर्व सुविधा वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहेत त्या साठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक मशीन या उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे
वसमत नगर येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सुविधा उपलब्ध झाल्याने वसमत तालुक्यातील नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे.
यापूर्वी वसमत तालुक्यातील गरजू रुग्णांना डायलेसिससाठी हिंगोली, नांदेड, परभणी अशा दूरच्या ठिकाणी जावे लागत होते. प्रवासाचा त्रास, खर्च आणि वेळेची अडचण यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन आहे आ. राजू भैया नवघरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला, शासन व आरोग्य विभागाकडे मागणी लावून धरली. त्या प्रयत्नांना यश आले असून आता वसमत उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस करता येणाऱ्या आधुनिक मशीन्स उपलब्ध झाल्या आहेत.
लवकरच या सुविधेमुळे रुग्णांना वसमत मध्येच दर्जेदार व वेळेत डायलेसिस उपचार मिळणार असून त्यांच्या आरोग्यासोबतच आर्थिक व मानसिक दिलासाही मिळणार आहे.
वसमत तालुक्यातील नागरिकां साठी आमदार या नात्याने राजू भैया नवघरे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे वसमत तालुक्यातील जनतेला नक्कीच मदत होईल या सुविधेचा जनतेने लाभ घ्यावा असे आ. राजू भैया नवघरे प्रतिष्ठान तर्फे आवाहन करण्यात आले आहे
