आ. राजूभैया नवघरेंनी केली बडा तलाव विकासाची पाहणी
आज दि. 21 रोजी वसमत शहरातील बडा तलाव येथे आमदार राजू भैया नवघरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांच्या बडा तलाव दुरुस्ती व सुशोभीकरण कामाची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली.
मागील वर्षी सदरील भागातील रहिवाशांना अतिवृष्टीमुळे तलाव फुटून झालेल्या नुकसानी कारणाने आमदार नवघरेंनी तलावाच्या दुरुस्ती व खोलीकरण तसेच सुशोभीकरण या कामाचे मंजुरी विशेष प्रयत्नातून मंजूर करून आणली त्यामुळे सदरील भागातील तलावाच्या खोलीकरणामुळे रहिवाशांना जमिनीतील पाणी पातळी वाढून उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता होणार आहे
तसेच बडा तलाव परिसरात सुशोभीकरणामुळे विकासाला चालना मिळणार आहे सदरील कामाच्या माध्यमातून तलाव परिसराचा सर्वांगीण विकास होऊन पाणी साठवण क्षमता वाढणार असून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुंदर वातावरण उपलब्ध होणार आहे. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
वसमत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे पाहणी दौऱ्यात त्यांनी नमूद केले
